शिवसैनिकांच्या वतीने नवनियुक्त संपर्क प्रमुख व सहसंपर्कप्रमुख यांचा सन्मान

0

बाणेर :

शिवसेना उपनेते,भारतीय कामगारसेना जनरल सेक्रेटरी, शिवसेना प्रवक्ते, माजी मंत्री सचिन आहिर यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी तसेच आदित्य शिरोडकर यांची सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना बाणेर-बालेवाडी-सुस-महाळुंगे प्रभागाच्या वतीने बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप मुरकुटे यांजकडून सन्मान करण्यात आला.

यावेळी शासकीय कमीटीचे सदस्य बाळासाहेब भांडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, शहरप्रमुख संजय मोरे, शिवउद्योग-सहकारसेना जिल्हा प्रमुख आशुतोष आमले, भारतीय विद्यार्थीसेना जिल्हा संघटक रामभाऊ गायकवाड, शिवसैनिक संतोष भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसैनिकांनी बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे मधील शिवसैनिकांना न्याय मिळावा. प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही निश्चितच पार पडू असे आश्वासनही दिले.

See also  सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा हेच कर्तव्य समजून विविध उपक्रम.