समाजातील तळागाळातील खरे कोरोना योध्दा चा सन्मान “बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन” च्या वतीने

0

बालेवाडी :

कोरोना काळातले खरे करोना योध्ये म्हणजे समाजातील अगदी तळागाळातील माणूस. वॉचमन, गार्ड, सफाई कामगार, हेल्पर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हाउसिंग सोसायट्यांमध्ये अहोरात्र काम केले.कोरोना बाधितांना औषधे, जेवण, लिफ्ट सॅनिटाईझेन , साफसफाई अशी कामं करून त्यांनी सेवा दिली. त्यांचे कौतुक करण्यासाठी बालेवाडी येथील “बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन” च्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या खर्या योद्धयांचा सत्कार करण्यात आला.

जून महिन्यात फेडरेशन तर्फे ज्युपीटर हाॅस्पिटल च्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात बालेवाडीतील नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन मोलाची मदत केली. यामुळे बालेवाडीत करोना बऱ्याच प्रमाणात रोखला गेला. बालेवाडी फेडरेशनने याप्रसंगी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अपघात विमा योजना पत्राचे वाटप महापौर मोहोळ यांच्या हस्ते केले. ज्युपिटर हॉस्पिटलच सिईओ डॉ. राजेंद्र पाटणकर आणि औंध क्षेत्रिय आरोग्य अधिकारी नितिन लोखंडे यांनाही करोना योध्ये म्हणून गौरविण्यात आले.

महापौरांनी फेडरेशनच्या कामाचे कौतुक केले. नागरिकांनी असेच पुढे येऊन लोकप्रतिनिधी आणि महापालिका यांच्या सोबत काम करुन आपल्या भागाचा विकास करून घ्यावा असेही त्यांनी मत व्यक्त केले. तसेच ॲमिनिटी स्पेस बद्दल बोलताना महापौर यांनी सांगितले, नागरिकांच्या हितास बाधा पोहोचेल असे कोणतेही काम केले जाणार नाही नागरिकांना पूर्ण विश्वासात घेतले जाईल. ॲमिनिटी स्पेस नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी वापरल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.

या प्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योति कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, डॉ.सागर बालवडकर, प्रल्हाद सायकर , लहू बालवडकर, प्रा. रूपाली बालवडकर, सचिन दळवी, शिवम बालवडकर, संतोष धनकुडे उपस्थित होते. फेडरेशनचे सचिव इंद्रजित कुलकर्णी, संचालक मोरेश्वर बालवडकर, डि डि सिंग, परशुराम तारे, विजय गायकवाड, शकिल सलाटी ,अमित पै यांनी विशेष परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला. आदिती पायस यांनी सुत्रसंचलन केले तर विकास कामत यांनी सर्वांचे आभार मानले.

See also  बाणेर बालेवाडी मध्ये काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जीवन चाकणकर यांच्या माध्यमातून होणार.जीवन चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी फेडरेशनचे विविध उपक्रमांची माहिती दिली तर उपाध्यक्ष अशोक नवाल यांनी फेडरेशनच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. फेडरेशन तर्फे महापौरांना विनंती करण्यात आली कि अमेनिटी स्पेस चा वापर जनतेसाठी क्रिडांगणे, बगीचे, वाचनालय , ओपन जीम, जॉगिंग ट्रॅक वगैरे साठी व्हावा. महापौरांनी आश्वासन दिले कि जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.