महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस – म्हाळुंगे ग्रामस्थांची नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी घेतली बैठक.

0

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुस व म्हाळुंगे या दोन गावांची पालकत्वाची जबाबदारी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे रविवारी सोपविण्यात आली. त्या धर्तीवर चांदेरे यांनी लगेचच कामाला सुरूवात करून, सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावात जाऊन संबंधित गावातील ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. नागरिकांच्या समस्या आणि महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांमधील असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केला.

यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी नागरिक आणि महानगरपालिका यामध्ये समन्वय कसा राखला जाईल त्याची माहिती सविस्तर सांगितली. महापालिकेकडून मिळणाऱ्या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना कशा मिळवून देता येईल याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घनकचरा, रस्ते, विद्युत, ड्रेनेज, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने गावांना प्राप्त होईल याची सविस्तर माहिती त्यांनी ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता येईल याची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.

समाविष्ट दोन्ही गावातील समस्या सोडविण्याकरिता नियोजनबद्ध विकास कसा करता येईल याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, या भागातील खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांच्याशी चर्चा करून परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

दोन्ही गावातील ग्रामस्थांनी सांगितलेल्या अडचणी नगरसेवक चांदेरे यांनी घेतलेल्या बैठकीमुळे ग्रामस्थांच्या मनामध्ये असणारा संभ्रम बऱ्यापैकी दूर होण्यास मदत झाली.

See also  शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करावे : रवींद्र मिर्लेकर