राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने डॉक्टर्स डे उत्साहात साजरा! लोकमत समूहाचे संपादक विजय बाविस्कर यांनी केले मार्गदर्शन.

0

बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने डॉक्टर डे निमित्त साधून कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या कार्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता लोकमत समुहाचे संपादक विजय बाविस्कर आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना लोकमत समूहाचे संपादक विजय बाविस्कर यांनी डॉक्टरांच्या प्रति ऋण व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार हे केवळ टीकात्मक लिहितात असा गैरसमज लोकांमध्ये असून पत्रकार हे चांगल्या कामाची स्तुती करण्यास मागे पुढे पाहत नाही. म्हणून डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या कामाचा सन्मान करण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, डॉक्टर हा जीवदान देणारा, प्राणदान देणार आहे. डॉक्टरांकडे जादुई स्पर्श किमया असते. तसेच पैसा कमावणे सगळ्यांनी गरजेचे आहे परंतु डॉक्टरांनी बँक बॅलन्स कडे पाहू नये तुम्ही चांगले काम करत आहात, त्यामुळे पैसा आपोआप येणार आहे. रुग्णाची समाजाची सेवा करताना स्वतःची देखील काळजी घ्यावी, समाजाला निरोगी राहण्यासाठी आपली गरज आहे.

नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बोलताना सांगितले, देशात कोरोना चे मोठे संकट आले त्यावेळी परिसरातील सर्व डॉक्टरांनी फार मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांच्याप्रती त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम करण्यात येत आहे. बाणेर बालेवाडी या परिसरात डॉक्टर असोसिएशन चांगल्या प्रकारचे काम करत आहे. पण तेवढ्यावर न थांबता परिसरांमध्ये चांगला दवाखाना उपक्रम लोकांना सेवा देण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम आम्ही केले आहे. बाणेर मध्ये असणारे कोवीड हॉस्पिटल मध्ये चांगले काम डॉक्टरांनी केले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांना सेवा दिली त्याबद्दल डॉक्टरांचे चांदेरे यांनी आभार मानले.

यावेळी डॉक्टर राजेश देशपांडे यांनी सांगितले की, गेली सोळा वर्ष नगरसेवक चांदेरे डॉक्टर डे चा कार्यक्रम घेतात. नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम त्यांनी केला आहे. बाणेर बालेवाडी डॉक्टर यांच्या वतीने प्रत्येक पेशंटला चांगली सुविधा कशी मिळविली जाईल यासाठी नियमित प्रयत्न केला जातो.

See also  बाणेर येथील कोविड हॉस्पिटल मध्ये मृतांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रकार उघडकीस : चतुःश्रुंगी पोलिसांची कारवाई

याप्रसंगी लोकमत समूहाचे विजय बाविस्कर, लोकमतचे महाप्रबंधक मिलन दर्डा, नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, समीर चांदेरे, किरण चांदेरे, अर्जुन रणवरे, माणिक गांधीले, प्रा. रूपाली बालवडकर, पुनम विधाते, सुषमा ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे आदी उपस्थित होते.