बाणेर व चतुःशृंगी टेकडीवर रविवारी घडल्या आगीची घटना. 

0

बाणेर :

बाणेर येथील टेकडीला आग लागल्याचे समजताच वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही अग साधारणतः तीन वाजायच्या आसपास लागलेली असावी.

आग लागलेली कळतच वसूंधरा अभियान बाणेर संस्थे च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन एक तासात पूर्ण आग विझवली. श्वास घेण्यात प्रचंड त्रास होत होता. एक सदस्य चोहोबाजुंनी आगीत सापडला. तरीही कष्टाने टाकीतून पाणी काढून 4 वसूंधरा सदस्यांनी पूर्ण आग विझवली.

चतुर्शिंगी टेकडी सीपीआर पोलीस ऑफिस तसेच लोयला स्कूल मागे डोंगरावरती गवताला आग चार वाजायच्या आसपास लागली होती. पाषाण व औंध अग्निशमन केंद्र कडील दोन वाहने एकूण सहा जवान एक अधिकारी तसेच फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी यांनी पाणी मारून तसेच गवताला झोडून आग विझवली. सदर ठिकाणी सदर आगीवर पाषाण अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर शिवाजी मेमाने, चालक लतेश चौधरी, कदम फायरमन, जवान विष्णु राऊत, विनोद सरोदे, विजय चव्हाण, स्वप्निल वाघमारे, यांनी काम केले.

दोन फायर इंजिनचे मदतीने एकुण आठ गाड्या पाणी वापरले तसेच फायर बिटरचा वापर करून जवानांनी आग आटोक्यात आणली व विझविली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला जवळपास चार तास लागले.

 

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाव भेट दौऱ्या दरम्यान जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या....  समस्या सोडवण्याचे राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे यांनी दिले आश्वासन.