मंगळवार दिनांक २ मार्च अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट

0

पुणे:

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला (मंगळवार, २ मार्च) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी येणाऱ्या सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे.

See also  पालिकेची शहरातील ३० वाहनतळ एकाच कंपनीला चालविण्यास देण्याच्या घाट !