छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बाणेर गावात उभारणे अभिमानाची गोष्ट : बापट

0

बाणेर :

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे कुलदैवत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावांमध्ये त्यांचे स्मारक उभारणे हे प्रेरणा व स्फूर्ती देणारे ठरणार आहे. शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते. तसेच ते कोणी एका समाजाचे नसून सर्व समाजाचे होते. अशा छत्रपती शिवाजी महाराजां चे स्मारक बाणेर गावात उभारणे ही अभिमानाची गोष्ट आहे असे, मत खासदार गिरीश बापट यांनी मांडले. बाणेर येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाहक महेश करपे, महापौर मुरलीधर मोहोळ, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर,  बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे, नगरसेवक दिपक पोटे, नगरसेवक किरण दगडे, डॉ. सागर बालवडकर, गणेश घोष, किरण साळी, लक्ष्मण सायकर, गणेश कळमकर, विशाल विधाते, अनिकेत मुरकुटे, शंकर सायकर, राजेंद्र मुरकुटे,  राजेश विधाते, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर,  गोरख दगडे, आणि स्वराज्य प्रतिष्ठान चे कार्यकर्ते बाणेर गावचे नागरीक आवर्जुन उपस्थित होते.

बाणेर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अनेक वर्षांनी पूर्ण होत असून, यासाठी विविध मान्यता मिळवण्यासाठी, ध्येय ठेवून हाती घेतलेले काम निश्चितपणे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही व हे काम प्रल्हाद सायकर यांनी पूर्ण केले आहे, असे मत महापौर मुरली मोहोळ यांनी व्यक्त केले.

नगरसेविका स्वप्नाली सायकल याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, शिवाजी महाराजांचे स्मारक बाणेर गावठाणाच्या प्रवेशद्वारा जवळ असावे अशी इच्छा सर्व ग्रामस्थांची होती. त्यानुसार सर्व मान्यता घेऊन या अपेक्षा पूर्ण होत असताना आनंद होत आहे. या ठिकाणी नुसते महाराजांचे स्मारक उभे राहणार नसून, त्यांचे आचार विचार जपण्यासाठी अभ्यासिका ही उभारली जाणार आहे.

प्रल्हाद सायकर यांनी प्रास्ताविक मध्ये म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे प्रत्येक गावाचे वैभव असते. हे वैभव आता बाणेर गावालाही मिळणार आहे. यासाठी बाणेर गावाला गेले अनेक वर्षे थांबावे लागले. पण आता या स्मारकासाठी थांबायची आवश्यकता नसून हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे आपल्या परिसरातील अभिमान  वाढणार असून, वैभवात भर पडणार आहे.

See also  बालेवाडी फाटा येथे भाजपच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी आंदोलन.

या कार्यक्रमा प्रसंगी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्यावतीने  स्मारकासाठी अडीच लाखाचा निधी दिला. तर योगिराज नागरी पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयाचा निधी देण्यात आला. तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, बाणेर नागरी पतसंस्था व नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या वतीने निधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कळमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिकेत मुरकुटे यांनी मानले.

बाणेर येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन व्हिडिओ