आरटीई प्रवेश प्रक्रिया चे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

0

मुंबई:

बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई ) अंतर्गत खासगी इंग्रजी शाळेतील आरक्षित २५ टक्के जागासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियाचे संभाव्य वेळापत्रक राज्य शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेशासाठी शाळांची आजपासून चाचपणी करण्यात येणार आहे. पालकांना ९ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार असून पहिली आरटीईची लॉटरी ५ मार्च रोजी काढण्यात येणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेत शिकता यावे म्हणून आरटीई कायदा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून खासगी इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या आरटीई प्रवेशासाठी शाळांना गुरुवारपासून नोंदणी करता येणार आहे. आरटीईच्या संभाव्य वेळापत्रकानुसार ९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. ५ मार्च २०२१ रोजी आरटीई जागांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

ज्यांचे अर्ज निवडण्यात आले आहे अशा पालकांनी ९ ते २६ मार्च २०२१ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. तसेच त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर हाेणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यात प्रवेश घेता येणार असून त्यानुसार पहिला टप्पा २७ मार्च ते ६ एप्रिल, दुसरा १२ ते १९ एप्रिल, तिसरा २६ एप्रिल ते ३ मे आणि १० ते १५ मे या कालावधीत प्रवेश घ्यायचे आहे. यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्ये इतकीच प्रतिक्षा यादी राहणार आहे.

See also  केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील सत्ता संघर्ष नजीकच्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता