महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून समर्पित हेल्पलाइन सुरू

0

मुंबई :

राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महिलांसाठी समर्पित हेल्पलाइन सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

बदलापूर येथील शाळेत कंत्राटाने नेमलेल्या कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यासह राज्यात इतर भागात देखील महिला व बालकांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणांची माहिती सुलभपणे व तात्काळ पोलीस यंत्रणांमार्फत पोहोचण्यासाठी समर्पित हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

*8976004111, 8850200600, 022-45161635* या क्रमांकावर महिलांनी मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी केले आहे.

See also  दहावी, बारावी परीक्षेच्या 85 टक्के उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण; 5 जून पूर्वी निकाल लागण्याची शक्यता