पुणे :
पुणे पिजन मित्र असोसिएशन तर्फे वार्षिक बक्षीस वितरण सोहळा रवीवारी बाणेर धनकुडे फार्म येथे संपन्न झाला .प्रमुख पाहुणे म्हणून राहुल दादा बालवडकर, (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे) उपस्थीत होते. क्लबचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, सेक्रेटरी सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सलग तीन वर्ष शशिकांत बालवडकर यांच्या करण लॉफ्ट ने प्रथम क्रमांक पटकवला आहे त्याबददल त्यांना होंडा अकटिवा बक्षीस देण्यात आले, दुसरे सुनील अलकुंटे व तिसरे स्वप्निल दळवी यांना मिळाले. ही स्पर्धा मध्य प्रदेश (सतना) ते पुणे अशी 1000 किलोमीटर होती .