नियोजित कचरा डेपो विरोधात 3 डिसेंबर रोजी पुनावळे येथे घंटानाद आंदोलन

0

पिंपरी चिंचवड :

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे. त्याविरोधात पुनावळे येथील रहिवासी विविध माध्यमातून आपला विरोध दर्शवित आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 3 डिसेंबर रोजी लोटस बिझनेस स्कूल जवळ घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळी 10 वाजता हे आंदोलन करण्यात येणार असून झोपलेल्या प्रशासनाला आणि शासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे, पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटीचे उपअध्यक्ष सचिन लोंढे यांनी दिली.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट