अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्यांचा संप मागे, मागण्या मान्य होताच केला जल्लोष

0

मुंबई  :

मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यानी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यानी सातव्या दिवशी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्या कर्मचाच्यांनी घेतला होता. अखेर त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या आंदोलन करणाच्या कंत्राटी कर्मचार्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संप मागे घेत असल्याची या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यानी घोषणा केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस होता. मुंबईतल्या आझाद मैदानावर हे कर्मचारी आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनासाठी बसले होते.

गेले ८ दिवस या संपामुळे मोठ्या प्रमाणात बेस्टची सेवा विस्कळीत झाली होती. ज्याचा फटका मुंबईकरांना बसला होता, आता संप मिटल्याने लवकरच बेस्टची सेवा पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेस्टचे कर्मचारीआझाद मैदानात उपोषणाला बसले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच संपकरी कर्मचाऱ्यानी एकच जल्लोष केला..

कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मान्य झालेल्या मागण्या –

– बेसिक पगारात होणार वाढ

– वार्षिक रजा भर पगारी मिळणार

– दिवाळी बोनस मिळणार

-साप्ताहिक रजा मिळणार

– वार्षिक वेतनवाढ़ मिळण्याची शक्यता

– कामावर येण्या-जाण्यास मोफत पास

– संपादरम्यानचा गेल्या आठ दिवसांचा पगार मिळणार

– अपघात वेळी विनाकारण त्रास होणार नाही याचं आश्वासन

– आंदोलनकत्यांवर कारवाई होणार नाही

– निवृत्त कामगारांना प्राधान्य न देता तरुणांना प्राधान्य मिळणार

See also  वैद्यकीय महाविद्यालयातील पदे सरळ सेवेने भरण्याचा विचार : गिरीश महाजन