शिवम सुतार यांच्या वतीने पैलवान शुभम रणपिसे यांचा भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावल्या बद्दल केला सन्मान..

0

सुतारवाडी :

औंध येथे झालेल्या भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेत सुतावाडी गावचे पैलवान शुभम रणपिसे यांनी पैलवान ओंकार मरगजेचा पराभव करून मानाची गदा पटकावली त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार आणि शिवम सुतार यांच्या वतीने 5 हजार रुपये रोख रक्कम बक्षिस म्हणून देत सन्मान करण्यात आला.

याबद्दल माहिती देताना माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी सांगितले की, महाराष्ट्राची परंपरा, लाल मातीतला रांगडा खेळ म्हणजे आपली कुस्ती. आजवर कुस्तीबाबत कायमच आकर्षण राहिलं. कुस्ती वाढली पाहिजे, जपली पाहिजे यासाठी माझे वडील आणि मी कायमच प्रयत्नशील आहे. आपल्या सुतारवाडी गावातील युवा पैलवान कु.शुभम रणपिसे याने औंध येथे पार पडलेल्या भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली. त्याच्या या विजयाबद्दल मनोमन आनंद झाला. प्रसंगी अभिनंदन करताना 5 हजार रुपये रोख रक्कम बक्षिस म्हणून देत सन्मान केला.

शुभम हा अतिशय कष्टाळू…सकाळी 4 वाजता उठून व्यायाम करून लोकांच्या गाड्या धुण्याचे काम करतो. त्यानंतर दिवसभर कामाला जाऊन संध्याकाळी तालमीत व्यायाम करतो. अशा कष्टाळू जिद्दी आणि प्रामाणिक युवकांच्या पाठीमागे मी आणि माझे वडील कायमच खंबीरपणे उभे आहोत. आई-वडिलांच्या कष्टाची चीज करत आजवर त्याने अनेकदा कुस्तीमध्ये विजय होत नाव कमावले आहे, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे असे शिवम सुतार यांनी सांगितले.

See also  सनीज् ऑनलाईन समर कॅम्प मध्ये सहभागी व्हा आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव द्या !