मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला दिली स्थगिती..

0

मुंबई :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मुंबई हायकोर्टाने झटका दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई हाटकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला निधी वाटपावरुन झटका दिल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने निधी वाटपाबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदारांच्या निधी वाटपात खरंच पक्षपात होतो का ते समोर येण्याची शक्यता आहे.

मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी या विषयी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. त्यांच्या आरोपांची दखल घेत मुंबई हायकोर्टाने गेल्या आर्थिक वर्षात कोणाला किती निधी दिला? याचे तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

See also  नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी महा विकास आघाडीचे बैठकीचे सत्र सुरू