सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने सोमेश्वरवाडी आठवडे बाजारात खरेदी करणाऱ्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे पैठणी भेट

0

सोमेश्वरवाडी :

भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवरात्र आणि दिवाळीचे निमित्त साधून रामकृषी आठवडे बाजार आणि सचिन दळवी मित्र परिवार यांच्या वतीने खास भाजीपाला खरेदी करायला येणाऱ्या महिलांसाठी भव्य पैठणी लकी ड्रॉ आयोजित केला होता. नवरात्री पासून सुरू केलेला या कार्यक्रमात सात पैठणी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलांना भेट देण्यात आल्या

याबद्दल माहिती देताना युवा नेते सचिन दळवी यांनी सांगितले की, परिसरातील नारिकांसाठी मागील अनेक काळापासून शेतकरी आठवडे बाजार सुरू केला त्या माध्यमातुन परीसरात राहणाऱ्या महिला भगिनींना भाजीपाला जवळच्या जवळ उपलब्ध करून देता आला याचा आनंद आहे. या महिला भगिनींना लकी ड्रॉ मधुन पैठणी भेट देउन त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

या लकी ड्रॉ मध्ये पैठणी मिळविलेल्या भाग्यवान विजेत्या महिला पुढील प्रमाणे :
१. मिनाक्षी हेगडे (सोमेश्वरवाडी पाषाण)
२. रोहिणी सूर्यवंशी (संजय गांधी वसाहत पाषाण)
३. शोभाबाई दिवटे (सोमेश्वरवाडी पाषाण)
४. सोनाली चांडक (शिवरंजन टॉवर सोमेश्वरवाडी)
५. लक्ष्मीबाई बेलिटकर (सोमेश्वरवाडी पाषाण)
६. तेजस्विनी इंगळे (शिवरंजन टॉवर सोमेश्वरवाडी)
७. बेबीताई नानखेडे (संध्या नगर सोमेश्वरवाडी)

See also  पाषाण येथे महिला दिना निमित्त काही महिला रणरागिनीनचा विशेष महिला गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.