क्रांतीगुरु लहुजी पुरस्कार केदार कदम यांना विरोधीपक्ष नेते अजित पवार व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदान

0

पुणे :

क्रांतीगुरु वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीगुरू लहुजी पुरस्कार पत्रकार केदार कदम यांना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी स्मारक समितीचा कार्यअहवाल प्रकाशन करण्यात आले .

या कार्यक्रमास राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष बापूसाहेब डाकले, उपाध्यक्ष बाळासाहेब भांडे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, युवासेना उपअधिकारी मयूर भांडे, राम कसबे, राजू अडागळे, रवी पाटोळे, शांतीलाल मिसाळ, राम गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे,पत्रकार केदार कदम, वस्ताद विकास रानवडे, रत्नमाला जगताप, अनिरुद्ध खांडेकर, अश्विनी कदम, सर्जेराव गायकवाड, योगेश बोराडे मान्यवरांना यावेळी क्रांतीगुरु लहुजी पुरस्कार विरोधी पक्ष नेते अजित पवार व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

अजित दादा पवार म्हणाले, राज्यातील सरकार बदलले असले तरी पुणे महानगरपालिकेकडे सर्वांनी पाठपुरावा करून या स्मारकाचे काम जलद गतीने कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणादायी आहेत.

See also  'ग्लोबल मेयर्स चॅलेंज' या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याची धडक : महापौर मुरलीधर मोहोळ