पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी जीवन चाकणकर यांची निवड..

0

बाणेर :

बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते जीवन चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कै सौ अरुणा निवृत्ती चाकणकर (माजी सरपंच बाणेर) यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी जीवन चाकणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि भविष्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी कार्यरत राहणार असून बाणेर बालेवाडी भागात कार्यकर्त्यांची बांधणी करणार असल्याचे सांगितले. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून परिसरातील नागरिकांची सेवा करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार मना मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अरविंद शिंदे शहराध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी जीवन चाकणकर यांच्या कामाचे कौतुक करतानाच युवा पिढीचे आशास्थान म्हणून जीवनच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतानाच राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार जीवनच्या कामाची पद्धत पाहून त्यांना पुणे शहर राष्ट्रीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सांगितले. तसे नियुक्तीपत्र देखील दिले. या नियुक्तीमुळे जीवनला भावी वाटचालीसाठी निश्चितच बळ मिळणार असून या संधीचा पुरेपूर वापर करून पक्षाचे संघटनेचे काम जीवन अधिक बळकटीने करेल अशी अपेक्षा व्यक्त करत जीवन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कैलास कदम शहराध्यक्ष (पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी), प्रशांत सुरसे (शहराध्यक्ष पुणे शहर ओबीसी विभाग) माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर माजी नगरसेवक कैलास गायकवाड, दत्ता जाधव, अशोक मुरकुटे, राजेंद्र धनकुडे, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, अनिल संसार, बबनराव चाकणकर, भाऊसाहेब चाकणकर, धनंजय चाकणकर, दयानंद चाकणकर, नारायण चाकणकर, अर्जुन चाकणकर, सोमनाथ चाकणकर, पांडुरंग चाकणकर, बाळासाहेब चाकणकर, विनायक ताम्हाणे, अण्णा कुदळे, भाऊसाहेब चाकणकर, अमर लोंढे, खंडू ताम्हाणे व चाकणकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

See also  ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्यावतीने मकरसंक्रांत व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त परिसरातील महिलांना साडी वाटप