अयोध्या :
युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. येथे पोहचताच आदित्य यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचे मोठी घोषणाही ठाकरे यानी यावेळी केली.
यासाठी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी जागा देण्याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे पुढे म्हणाले की, अयोध्येला हे भारताच्या श्रद्धेशी निगडित शहर आहे. शिवसेनेने 2018 मध्ये ‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा दिला होता आणि त्यानंतरच रामनगरी अयोध्येत मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. भारताची श्रद्धा असलेल्या या शहरात न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर उभारले जात आहे. मी अयोध्येत राम लल्ला आणि हनुमानजींची भेट घेणार आहे आणि लोकसेवेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करणार आहे.
अयोध्येवरील राजकारणाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आम्ही निवडणुकीत जे बोलतो ते पूर्ण करतो. आम्ही राजकारण करण्याच्या उद्देशाने अयोध्येत आलो नाही. आम्ही भक्त म्हणून अयोध्येत आलो आहोत. अयोध्येतील ऋषी आमचे स्वागत करत आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करीत आहेत. या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, आज सर्व केंद्रीय संस्था प्रचार साहित्य बनल्या आहेत. रामांसोबतच आमचे अयोध्येतील सर्व जनतेशी जिव्हाळ्याचे नाते आहे. आपल्या हातून चांगली सेवा मिळावी म्हणून आम्ही येथे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. आदित्य हे त्यांचे वडिल आणि शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत यापूर्वी दोनदा अयोध्येला आले आहेत. आदित्य हे पहिल्यांदाच अयोध्येत एकटे आले आहेत. शिवसेना देखील राम मंदिर आंदोलनाचा एक भाग होती.