सुतारवाडी पाषाण भागातील युवकांचे शिवसेनेत प्रवेश. 

0

पाषाण :

शिवसेना शहर प्रमुख संजयभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते कमलेश सुतार यांच्यासह सुतारवाडी, पाषाण भागातील युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

केंद्र सरकारच्या नविन क्रुषी विधेयकांविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देण्यासाठी साईचौक पाषाण येथे गेल्या २३ दिवसांपासून पुणेशहर शिवसेनेच्या वतीने उपशहरसंघटक आशुतोष आमले व शिवसैनिकांचे रस्त्यावर तंबु ठोकुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. ज्या प्रकारे शिवसैनिक रात्रंदिवस उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता चिकाटीने आंदोलनावर ठाम आहेत याने प्रेरीत होऊन सुतारवाडी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते कमलेश काळुराम सुतार यांच्या सह समर्थकांनी आज शहरप्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शहरप्रमुख मोरे यांनी शिवसेना खंबीर पणे सर्वांच्या पाठिशी असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या शिकवणी नुसार भागातील जनतेच्या कामांवर भर देऊन कामाला लागा असे सांगितले, आमले यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी उपशहरसंघटक आशुतोष आमले, शिवाजीनगर मतदारसंघाचे समन्वयक सुशिल लोणकर, अजयभाऊ शिंदे, विभागप्रमुख राहुल जेकटे, युवासेना विभाग अधिकारी सनी गवते, बाणेर नागरी पतसंस्थेचे दिलीपभाऊ मुरकुटे, शाखा प्रमुख सुनिल राजगुरू, भरत दहिभाते, उपशाखाप्रमुख अविनाश राठोड, सामाजिक कार्यकर्ते अजय ढावरे, शिवनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष तोंडे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

See also  बालेवाडी फाट्यावरील सेक्स रॅकेटचा भांडाफोड चतुःशृंगी पोलिसांची कारवाई.