उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्या समोरच बीजेपी व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

0

पुणे:

भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत भामा आसखेड पाणी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व हुल्लडबाजी करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

अजित पवार व फडणवीस यांच्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात सत्तेसाठी झालेली औटघटकेची मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यामुळेच हे दोन नेते आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. करोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली.

भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ विरुद्ध ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’, अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही प्रमाणात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली. या घोषणा सुरू केल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, पोलिसांनी मध्यस्थी करुन कार्यकर्त्यांना शांत केले. श्रेय घेण्यावरून आम्ही विरोध करत आहोत असे भाषण करते म्हणत होते पर्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार अक्षरवेल अजित पवारांच्या प्रयत्नांनीच हा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगितले.भाजप कार्यकर्ते देत असलेल्या घोषणा गिरीश बापट यांच्या नावाने असल्याने भाजपच्या अंतर्गत गटबाजी असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला आहे. पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झाले. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकां भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

See also  रेकी करून दरोडा टाकणाऱ्या वर चतुःशृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत मोक्का कारवाई. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. निमित्त, पुणे महापालिकेच्या भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.