वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चतु:श्रृंगी पोलिसांनी केले अटक !

0

पुणे : चतु:श्रृंगी :-

मौजमजा करण्यासाठी वाहन चोरणाऱ्या व नंतर पेट्रोल संपले म्हणून वाहन सोडून देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून दहा चोरीच्या मोटर हस्तगत केले आहे. चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक २८/१२/२०२० रोजी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक प्रकाश आव्हाड व सारंग साळवी यांनी मिळालेल्या बातमीनुसार अमीनूर बहाब मंडल, वय 27 राहणार सध्या कपिल मल्हार सोसायटी जवळ, शिंदे पारखे मळा, बाणेर पुणे. मूळ गाव काशीपूर ठाणा, हाबडा, पश्चिम बंगाल हा पुणे शहरामध्ये ठिकाणी वाहनांची चोरी करत असल्याची माहिती मिळाली.

सदर माहिती अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण पूर्व प्रदेशिक विभाग पुणे शहर उपायुक्त पंकज देशमुख परिमंडळ पुणे 4 पुणे शहर, सहा.पोलीस आयुक्त, रमेश गलांडे, खडकी विभाग पुणे शहर यांना माहिती देवून त्यांनी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक,मोहनदास जाधव, महेश भोसले व कर्मचारी पो. हवा. दिनेश गडांकुश, मुकुंद तारू, पोना श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर मुळे, आशिष निमसे, पो.शि.अमोल जगताप,वसिम सिद्दीकी व तेजस चोपडे यांची टिम तयार करून सदर इसमाना सापळा रचून ताब्यात घेतले.

तपास केला असता वाहनचोरीचे ०८ गुन्हे चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन कडील एकूण ०६ गुन्हे, विश्रामबाग व अलंकार पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी ०१ गुन्हा असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर गुन्हयामध्ये एकूण ५,००,०००/- रूपयेच्या ८ स्प्लेंडर मोटर सायकल, १ युनिकॉन मो.सा.एक ॲक्टिवा हस्तगत करण्यात आला आहे.पुढील अधिक तपास मोहनदास जाधव हे करीत आहेत.

 

See also  पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा घेतला निर्णय