राज्यात आणखी एक संकट धुळीचे वादळ धडकले, काळजी घेण्याची गरज

0

मुंबई :

मानवनिर्मीत आणि नैसर्गिक दोन्ही संकटांशी गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना लढावं लागत आहे. परिणामी नागरिकांना काळजी घ्यावी लागत आहे. अशात आता राज्याच्या वेशीवर नवं संकट आलं आहे.

राज्यात सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. तसंच राज्यात काही दिवासांपूर्वी अवकाळी पाऊस आला होता. या पावसानं अधिक प्रमाणात नुकसान केलं होतं.

सध्या राज्यात धुळीचं वादळ धडकलं आहे. परिणामी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. पाकिस्तानात पहिल्यांदा सुरू झालेले हे वादळ सध्या महाराष्ट्रात दाखल झालं आहे.

राज्यात धुळीचं वादळ धडकलं आहे परिणामी कोकणासह मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली आहे. या वादळानं अचानकपणे राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

धुळीकणांच्या अचानकपणे मोठ्या प्रमाणात येण्यानं वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाकिस्तानातून हे वादळ अरबी समुद्रामार्गे राज्यात पोहोचले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी दोन्ही शहरांमध्ये थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

सोसाट्याचा वार वाहत असून सध्या 25-30 ताशी वेगानं वारे वहात आहे. पुण्यात अतिसुक्ष्म धुलिकरणाचे प्रमाण पीएम 2.5 इतकं आहे. तर धुलीकरणाचे प्रमाण सध्या पीएम 10 प्रमाणे 100 प्रति घनमीटर इतके आहे.

वाळवंटी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते त्यामुळं प्रचंड वेगानं ही धुळ वाऱ्यामध्ये मिसळते. अशा परिस्थितीत प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

See also  पाच महिन्या नंतर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची बदली.