बाणेर टेकडी परिसरात सलग दोन दिवस आगी मुळे १५०-२०० झाडांचे नुकसान. 

0

बाणेर :-

बाणेर टेकडी परिसरात सलग दोन दिवस लावलेल्या आगी मूळे 150-200 झाडांचे आगीत नुकसान झाले आहे. सुमारे पन्नास एकर हून अधिक जैवविविधतेचे नुकसान यावेळी झाले.वसूंधरा अभियान बाणेर या संस्थे मार्फत तूकाई टेकडीवर वृक्ष रोपण पर्यावरण संवर्धन 2006 पासून चालू आहे.

मागील दोन दिवसात लावलेल्या आगीत 150-200  झाडे , अनेक जिवजंतू, किटक , सरपटणारे प्राणी, पक्ष्यांचे घरटे नामशेष झाले. तसेच या परिसरात असलेले काही दुर्मिळ झाडे देखील या वेळी नष्ट झाली. पूर्व कडील भागात लागलेल्या आगीत जवळपास 50 एकर पेक्षा अधिक भागात ही झळ पोहचली.

वसूंधरा अभियान सदस्य व स्थानिक नागरिकांनी सतर्कतेने आग विझवली.डोंगरावरती सिगरेट पिणारे तसेच आग लावणारे दिसल्यावर नागरिकांनी अशा लोकांना थांबवावे असे आवाहन यावेळी वसुंधरा अभी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

तसेच वनविभाग व पालिकेच्या माध्यमातून या परिसरातील दुर्मिळ वृक्षांची व झुडपांची देखील संवर्धन करण्यासाठी संरक्षण यंत्रणा तयार करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने वकिलांचा सन्मान...