नवीन प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास निवडणुक आयाेगाने महापालिका प्रशासनाला दिली ६ डिसेंबरपर्यंतची मुदत

0

पुणे:

आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास निवडणुक आयाेगाने महापालिका प्रशासनाला ६ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आराखडा पूर्ण हाेईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

राज्य सरकारनेे महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार राज्य निवडणूक आयाेगाने पुणे महापालिका प्रशासनाला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास सांगितले हाेते. हा आराखडा सादर करण्याची मुदत मंगळवारी ३० नाेव्हेंबर संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाने निवडणूक आयाेगाला पत्र पाठवून पंधरा दिवस मुदतवाढ मागितली हाेती.

अद्याप प्रभाग रचना व परिशिष्ठांचे कामच पूर्ण न झाल्याने मुदतीत आराखडा सादर होऊ शकला नसता. यामुळे निवडणुक आयाेगाकडून मुदतवाढ मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. पुण्याबराेबरच इतर काही महापालिका प्रशासनाने देखील पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितली हाेती.

साेमवारी सांयकाळी निवडणूक आयाेगाकडून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास ६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. कच्चा आराखडा तयार करण्याचे काम ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल आणि ताे सादर केला जाईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

See also  सर्व सामान्यांना आर्थिक मदत कशी मिळणार ? : चंद्रकांत पाटील