नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या प्रयत्नाने बाणेर येथील सुसज्ज असे क्रीडांगण निर्माण करण्याचे भूमिपूजन सोहळा पार.

0

बाणेर :

बाणेर येथील नागरिकांची क्रिडांगणाची गरज लक्षात घेऊन नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सर्व सोयींनी सुसज्ज असे क्रीडांगण निर्माण करण्यासाठी सुरूवात केली आहे. सध्याची आवश्यकता व्यायाम करणे खेळणी ही आहे. यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. प्रभाग क्रमांक ९ मधील पुढील पिढीला तीन एकर जागेमध्ये १८ प्रकारचे खेळ खेळता येणारे क्रीडांगण या ठिकाणी उभारण्यात येत आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

बाणेर हा स्मार्ट सिटी चा पहिला टप्पा आहे. यामुळे बाणेर तर स्मार्ट होतच आहे तसेच या परिसरातील नगरसेवक देखील आपल्या कामाच्या बाबतीत स्मार्ट आहेत असे भारतीय जनता पक्ष पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले. बाणेर येथे नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या विकास निधीतून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या क्रीडा उद्यानाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी क्रीडांगणाची माहिती देताना नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने हे क्रीडा उद्यान साकारण्यात येत आहे एकूण तीन एकर जागेत हे क्रीडा उद्यान आहे या ठिकाणी 18 प्रकारचे खेळ खेळता येणार आहेत त्यामध्ये कबड्डी, मलखांब, स्केटिंग, बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट सारख्या खेळांचे मोफत प्रशिक्षण देखील स्वराज प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या जागेतील बाणेर येथील महानगरपालिकेचे हे पहिलेच क्रीडा उद्यान तयार होत आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, पूनित जोशी, प्रकाश बालवडकर, उमा गाडगीळ, दिलीप परब, राहुल कोकाटे,सचिन पाषाणकर, डॉ राजेश देशपांडे, बबनराव चाकणकर, आदी उपस्थित होते.

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांचा एक कोटी आमदार विकास निधी बाणेर येथील कोवीड रुग्णालयासाठी.