बाणेर येथील भव्य तीन एकरातील क्रीडांगणाचा भूमिपूजन सोहळा व बाणेरकरांसाठी बाणेर महोत्सवाची मेजवानी

0

बाणेर :

बाणेर गावातील ताम्हाणे चौकात बाणेर गावच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी देण्याच्या उद्देशाने, नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर अध्यक्ष औंध प्रभाग समिती आणि भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांच्या प्रयत्नातून अतिशय भव्य स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या तीन एकरातील क्रिडांगणाचा भुमीपुजन सोहळा भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या शुभहस्ते शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. होणार आहे. रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते परिसरातील मुलांसाठी मोफत विविध खेळांचे प्रशिक्षण मिळावे म्हणून क्रिडा अकॅडमी चे उद्घाटन होणार आहे. तसेच परिसरातील मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांसाठी रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी बाणेर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

याची माहिती मॅकन्यूज ला देताना नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी म्हणून अग्रगण्य असणारे बाणेर गाव क्रिडा क्षेत्रात अग्रगण्य असताना येथे बाणेरगावच्या हक्काचे क्रीडांगण उपलब्ध नसल्याची खंत बरेच दिवसापासून मनामध्ये होती. म्हणूनच बाणेरगावच्या क्रीडाक्षेत्रास उभारी देण्याचा उद्देश समोर ठेवून बाणेर गावातील पहिले भव्य तीन एकरातील क्रीडांगण बाणेर परिसरातील नागरिकांसाठी निर्माण करत आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. होणार असुन सर्व लहान थोरांनी उपस्थित राहून बाणेर गावचे मानबिंदू ठरणाऱ्या या क्रीडांगणाच्या भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आव्हान करत आहे.

क्रीडांगणाच्या भूमिपूजन सोहळ्या बरोबर खेळाडूंसाठी क्रीडा अकॅडमीचे उद्घाटन आणि बाणेर येथील नागरिकांसाठी खास बाणेर महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. या बाणेर महोत्सवामध्ये महिलांसाठी मेहंदी, बाळगोपाळांसाठी टॅटू व विविध खेळ, संदीप पाटील यांचा जुन्या नव्या मराठी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम ठेवले आहेत. या दोन्ही कार्यक्रमाचा आनंद परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी "सॅनिटायझ विथ सनी" उपक्रम...