खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंगे येथे डॉक्टर दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन..

0

म्हाळुंगे :

महा विकास आघाडीचे शिल्पकार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील, गणेश मुरकुटे पाटील आणि लीना गणेश मुरकुटे पाटील यांच्या वतीने म्हाळुंगे येथील विठ्ठल मंदिर मैदानावर विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून परिसरातील पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच पीएमआरडीए सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमूख गजानन थरकुडे म्हणाले की, एखादा शिवसैनिक कार्यकर्ता कशा प्रकारे काम करू शकतो हे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडे पाहून कळते. गोरगरिबांच्या अडचणी सोडवायचे काम ते करतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या सारखा समाजसेवक आपल्यामध्ये आहे हे आपले भाग्य आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल पक्षप्रमुख घेत आहेत. पुढील काळात त्याची प्रचिती नक्कीच येईल. शिवसेनेत केलेल्या कामाचे कौतुक नेहमीच होत असते.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, अरुण दिघावकर, उप जिल्हा प्रमुख संतोषमोहोळ, माजी सरपंच जंगल रणवरे, अर्जुन शिंदे, विशाल विधाते, अर्जुन ननावरे, राम गायकवाड, मकरंद कळमकर, सुनील कळमकर, सोपान पाडाळे, श्याम बालवडकर, लक्ष्मण पाडाळे, राजू शेडगे, ह भ प निवृत्ती कोळेकर, सरपंच मयुर भांडे, संतोष भोसले, मारुती चांदेरे, शांताराम पाडाळे काळुराम कोळेकर शिवाजी चिव्हे, माजी महिला तालुकाप्रमुख गीता गुजर, ह-भ-प काळे महाराज, किरण सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.

 

See also  शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिला खुलासा