मास्क न वापरल्या बद्दल अजित पवारांनी रोहित पवारांना खडसावले

0

अहमदनगर :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्याने त्यांनी आपल्या खास शैलीत ते बोलून दाखवलं.

रोहित पवार मास्क वापरत नव्हते तेव्हा त्यांना अरे शहाण्या, तू तर आमदार आहेस तूच मास्क वापरला नाहीस तर लोक कसे वापरणार असं म्हणत, मी व्यासपीठावर बोलतानाही मास्क काढत नाही, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, अजित पवार हे आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिध्द आहेत. त्यातच त्यांना एखादी गोष्ट रुचली नाही तर ते थेट तोंडावर बोलतात त्यामुळे बरेच अधिकारीही अजित पवार यांच्यासमोर बोलायला धजावत नाहीत. अशातच आता रोहित पवारांनी मास्क वापरत नसल्याने त्यांनी रोहित पवारांनाही आपल्या खास शैलीत समज दिल्याचा किस्सा सांगितला.

अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्यावर जनतेने विश्वास टाकला आणि दुष्काळी भागात रोहित पवार यांनी कोरोनाकाळात उत्तम काम करत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, असे स्तुतीचे उद्गारही अजित पवारांनी आवर्जून काढले. परंतु, मास्क न वापरण्यामुळे अजित पवार यांनी रोहित पवार यांना फटकारल्याचीच चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळालं.

 

See also  मुंबईतील आग प्रकरणी राज्य सरकार आणि मोदी सरकार यांनी एकत्र येऊन घेतला मोठा निर्णय