भाजपा प्रभाग क्रमांक ९ महिला पदाधिकारी व लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने नवरात्री निमित्त भोंडला व दांडिया महोत्सव उत्साहात साजरा.

0

बालेवाडी :

प्रभाग क्र. ९ बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे येथील भारतीय जनता पार्टी च्या महिला पदाधिकारी व लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने बालेवाडी येथील रनभूमी मल्टिस्पोर्ट्स टर्फ येथे नवरात्रीनिमित्त भोंडला व रास दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

याबद्दल मॅक न्यूजला माहिती देताना भाजपचे युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, भारतीय सांस्कृतिक जपणे त्याचा प्रसार करणे हा हेतू ठेऊन आपल्या पारंपरिक आणि पिढ्यानंपिढ्या चालत आलेल्या या कार्यक्रमात सर्वांना सहभागी होता यावे. आपली संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी व अधिक बळकट करण्यासाठी असे सण लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर साजरे केले गेले पाहिजे. म्हणुनच नवरात्री निमित्त भोंडला व रास दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रभाग क्र. 9 च्या महिला आघाडीच्या उमा गाडगीळ, नैना पोळ, उज्वला साबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तर या महोत्सवाला पुणे महापालिका शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, औंध प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर उपस्थित होते.

 

See also  प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी येथील भारतीय जनता पार्टी कार्यकारणी घोषित