“राष्ट्रवादी चषक गौरी सजावट स्पर्धा- २०२१” चा प्रथम क्रमांक सुसगाव च्या पौर्णिमा मानमोडे यांनी पटकावला

0

बाणेर :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे यांच्या वतीने आयोजित केलेल्या “राष्ट्रवादी चषक गौरी सजावट स्पर्धा- २०२१” या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी वैशाली राहुलभैय्या मोटे यांच्या व प्रेक्षाताई विजयराव भांबळे यांच्या शुभहस्ते व शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे तसेच लावणी सम्रागणी सुरेखा पुणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

पोरितोषिक विजेत्या महिलांची नावे

प्रथम क्रमांक – पौर्णिमा अनिल मानमोडे (एल.ई.डी,टीव्ही)

द्वितीय क्रमांक – वैशाली बाळासाहेब कदम (फ्रीज)

तृतीय क्रमांक – शिवानी आशिष खैरे (वॉशिंग मशीन)

चतुर्थ क्रमांक – आशा अदिनाथ देशमुख (ओव्हन)

पाचवा क्रमांक – अश्विनी कुंदन रासकर (फुड प्रोसेसर)

सहावा क्रमांक – कांता बोंद्रे (साउंड बार)

सातवा क्रमांक – चंदा नितीन सोनेले (मिक्सर)

आठवा क्रमांक – प्रमिला किसन बालवडकर (इस्त्री)

नववा क्रमांक – ललिता संतोष अवसरे (कॉपर बुफे सेट)

दहावा क्रमांक – द्वारका भरत टोणपे (लेझर डब्बे मोठे)

अकरावा क्रमांक – स्वाती दशरथ मोकाटे (टॉप विथ एल.ई. डी.)

बारावा क्रमांक – वर्षा राजेंद्र माणे (डिनर सेट)

तेरावा क्रमांक – आशा राजेंद्र शेलार (लेमन सेट)

चौदावा क्रमांक – अश्विनी प्रविण बारंगुळे (गॅस स्टोव्ह)

पंधरावा क्रमांक – प्रणाली विकी भंडारे (लेझर डब्बे छोटे)

असे एकूण १५ विजेत्या महिलांनी बक्षिसे पटकावली तर ५५ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलेस प्रेशर कुकर भेट वस्तू देण्यात आली.

या कार्यक्रमा दरम्यान मानाच्या पाच पैठणी लकी ड्रॉ काढून देण्यात आल्या. या मध्ये रेश्मा दादा पिंगळे, पौर्णिमा अनिल मानमोडे, द्वारका श्रीखंडे, मिनाक्षी पांडुरंग पाडाळे, रुक्मीनी ढाले या महिलांनी पैठणी मिळविल्या.

याप्रसंगी लीला कळमकर, सरला चांदेरे, मा.सरपंच अंजना चांदेरे, विमल बालवडकर, सुरेखा साळुंखे, सारिका काळभोर, प्रा. रुपाली बालवडकर, पुनम विधाते, सुषमा ताम्हाणे, अश्विनी चांदेरे, प्राची सिद्दकी, पुजा चांदेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर नागरी पतसंस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार.