आयत्यावेळी प्रस्ताव आणून त्यावर जास्त चर्चा न घडू देता ते मंजूर करवून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा महानगर पालिकेत धडाका सुरू

0

पुणे :

सुरक्षा रक्षक पुरविण्याची एका आमदाराशी संबधित कंपनीची 41 कोटी रुपयांची निविदाही ऐनवेळी आणून ‘एकमताने’ मान्य केलीपुन्हा भाजपच्या या राजवटीत ठेकेदारांची चंगळ आणि रोजंदारीसाठी वणवण करणाऱ्यांसाठी ‘मंगळ’ हेच धोरण अंमलात आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. .विशेष म्हणजे यासंदर्भात कुठेही तक्रारी, विचारणा, आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. आयत्यावेळी प्रस्ताव आणून त्यावर जास्त चर्चा न घडू देता ते मंजूर करवून घेण्याचा धडाका सुरूच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

महापालिकेमध्ये 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांमध्ये ड्रेनेज लाईन तसेच मांजरी आणि केशवनगर येथे एसटीपी प्लांट उभारण्याची 392 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. एसटीपी प्लांटसाठी जागा ताब्यात नाही. तसेच निविदेच्या अटीशर्ती या एका ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आल्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखिल दाखल केली आहे. या निविदेवरुन एवढे आरोप प्रत्यारोप होत असताना प्रशासनाने ही निविदा आज ऐनवेळी मान्यतेसाठी ठेवली. ती सर्व पक्षांनी एकमताने मान्य केली. विशेष असे की ज्या ठेकेदारावरून आक्षेप घेण्यात आला होता, तीच ठेकेदार कंपनी मे. खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. व एस.ए. इन्फ्रा या कंपनीला मिळाली. या कंपनीने 7. 80 टक्के कमी दराने निविदा भरली आहे.

यापाठोपाठ महापालिकेची विविध क्षेत्रिय कार्यालये, मंडई, मनपा भवन, मध्यवर्ती कोठी आदी ठिकाणी सुरक्षा विभागामार्फत बहुद्देशीय कामगार पुरविण्याची 41 कोटी रुपयांची निविदाही मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली होती. हे सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वात कमी रकमेची आहे. ही निविदाही एकमताने मंजुर करण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे दाखल आणि मान्य झाले प्रस्ताव

– प्रयेजा सिटी ते वारजे येथे महामार्गालगत असलेल्या सेवा
– रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधण्यासाठी सुमारे 1 कोटी 62 लाखाची निविदा मंजुर
– देवाची उरुळी- फुरसुंगी येथील कचरा प्रक्रीया प्रकल्पात तयार होणार्‍या लिचेटवर प्रक्रीया करण्यासाठी सुमारे ९५ लाख रुपयांची निविदा मंजुर
– स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण आणि प्रकल्प व्यवस्थापनाकरीता सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.
– कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील सर्पोद्यान,
– वन्य प्राणी अनाथालय यांचे देखभालीचे का

See also  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त २५५ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार : हेमंत रासने