ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता.

0

पुणे :

शहरातील 270 ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आणलेला प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

या ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी घेतला होता. दरम्यान आज महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब झाली आणि ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अचानक भूमिका बदलल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही खदखद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत ॲमेनिटी स्पेसचा प्रस्ताव ठेवला गेला. मात्र, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केल्यामुळे सभा तहकुब करण्यात आली. भाजपने महापालिकेत बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करून घेतला असता तरी, राज्य सरकारने तो अडवला असता, असं महाविकास आघाडीच्या नेत्याचं म्हणणं आहे.

See also  पुणेकरांना मोठा दिलासा, पाणीपुरवठा करणारी चार ही धरणे 100 टक्के भरली.