आमदार महेश लांडगे यांचा शहीद जवानाच्या बहिणीला रक्षाबांधनातून आधार

0

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्यात बहिरेवाडी गावातील ऋषिकेश जोंधळे हा जवान पाकिस्तान सीमेवर लढताना जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरापूर्वी धारतीर्थी पडला. भाऊबीजेच्या दिवशीच त्यांचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या बहिणीवर आली.

ऐन दिवाळीत घरातील एकुलता एक मुलगा व या बहिणीचा एकुलता एक भाऊ जोंधळे कुटुंबियांनी गमावला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला होता.

पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न करत शहीद जवान ऋषिकेश यांची बहीण कु. कल्याणी रामचंद्र जोंधळे हिच्या आयुष्यात असणारी भावाची पोकळी भरुन काढण्याचा मानस करत यावर्षीचे रक्षाबंधन बहिरेवाडी येथे जोंधळे कुटुंबियासोबत साजरा करण्याचा संकल्प आमदार लांडगे यांनी केला आहे.

पाकिस्तान सैन्याने ऐन दिवाळीत जम्मू काश्मीर येथील सीमेवर दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी गोळीबार केला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देताना ऋषिकेश जोंधळे गंभीर जखमी झाले होते त्यात त्यांना वीरमरण आले होते. यापूर्वीही प्रतिक यलगर यांनीही सीमेवर हौतात्म पत्करले होते. बहिरेवाडी गावातील युवकांनी संपूर्ण महाराष्ट्राला देशाप्रती बलिदान देण्याचा आदर्श घालून दिला आहे.

आमदार लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कल्याणीला आपली बहीण मानले. त्याद्वारे अनोखे रक्षाबंधन साजरे करत यामधून सामाजिक आदर्श उभा होईल.

या वेळी महेश लांडगे म्हणाले की, सीमेवर लढणारे जवान, आजी- माजी सैनिकांप्रती देशातील प्रत्येक बांधवाला आदर आहे. कोल्हापरच्या मातीशी माझ्या कुटुंबाचे विशेष नाते आहे. कसबा बावड्याच्या शासकीय कुस्ती केंद्रामध्ये उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना पाकिस्तान सीमेवर लढताना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था शब्दात व्यक्त न करता येणारी आहे. माझी व माझ्या कार्यकर्त्यांची राजकारण आणि पक्षविरहीत भावना आहे. कल्याणी जोंधळे हिला भाऊबीजेच्या दिवशी स्वत: भाऊ गमवावा लागला. मी आमदार असो किंवा नाही ऋषिकेशसारखा भाऊ समजून कधीही अडचणीच्या काळात मला हाक दे. हा भाऊ तुझ्या मदतीला धावून येईल. तुझ्या कुटुंबासोबत उभा राहील. शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर सोबत राहील, असेही आमदार लांडगे म्हणाले.

See also  राज्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोंधळे कुटुंबियांना घर बांधण्यासाठी मदत केली. घरचा वरचा मजला आमदार महेश लांडगे बांधून देणार आहेत. तसेच, कल्याणी हिला दुचाकी आणि लॅपटॉपही रक्षाबंधन निमित्त भेट देण्यात आला.