शरद पवारांनी कायम पुरोगामी विचार मांडले हे संपुर्ण देशाला माहित : अजित पवार

0

पुणे :

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, “राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो.

या मुद्द्यावरून निवडणुका लढल्या जातात आणि मतदानही होतं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे याआधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद वाढीस लागला,” असे मोठे विधान केले होते.

दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोक असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं करण नाही,” अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे शरद पवारांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले असून, “राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. आजोबांचं लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला होता

See also  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला एक लाख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद