राज्य सरकारची पूरग्रस्त भागात मदत आणि दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा

0

मुंबई :

मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. या जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं तर व्यापारांच्या दुकानातही पाणी गेलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागात मदत आणि दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानीबाबत सादरीकरण केलं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपये मिळणार आहेत, पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखाची मदत, अर्ध घर पडलं असेल तर 50 हजाराची मदत, दुकानदारांना 50 हजाराची मदत, टपरीधारकांना 10 हजार रुपये, एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत, जनावरांच्या मृत्यूंची 7 कोटींची भरपाई देण्यात येणार आहे.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना एसडीआरएफच्या निकषांनुसार 4 लाख रुपये, मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून 1 लाख रुपये, ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा रकमेतून 2 लाख रुपये, तर पंतप्रधानांनी जाहीर केलेले 2 लाख रुपये अशी एकूण 9 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात हे सर्व पंचनामे पुर्ण होणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 4 हजार 500 जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळणार आहे.

See also  कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी : नितीन गडकरी