सुस म्हाळुंगे गावांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे : महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन बाबुराव चांदेरे यांनी केली मागणी. 

0

बाणेर :

नव्याने समाविष्ट झालेल्या सुस म्हाळुंगे गावांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाणी पुरवठा केला जातो. परंतु सदर पाणीपुरवठा खुप कमी दाबाने असल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून खूप हाल होत आहेत, त्यासाठी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याकरिता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन समाविष्ट गावांमधील पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

दि. ३० जून २०२१ रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगतची २३ गावांची अंतीम आदीसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध करून हे २३ गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करून घेतले आहेत यामध्ये सुस व म्हाळुंगे गावाचा समावेश आहे.

सदर गावांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाणी पुरवठा केला जातो परंतु सदर पाणीपुरवठा खुप कमी दाबाने असल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून खूप हाल होत आहेत , त्यासाठी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याकरिता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची दि. ८ जुलै २०२१ रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या गावाच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय तातडीने दुर करावी तश्या सूचना संबंधित अधिकारी यांना तातडीने देण्याची मागणी चांदेरे यांनी केली. समाविष्ट केलेल्या गावांमध्ये प्रमुख्याने पाणी प्रश्न सोडण्यासाठी आग्रही असल्याचे बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.

See also  राष्ट्रवादीकडून सुस - म्हाळुंगे गावच्या पालकत्वाची जबाबदारी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे