बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस मध्ये जागतिक टेनिस हॉलीबॉल दिवस साजरा.

0

बालेवाडी :

पुणे जिल्हा टेनिस हॉलीबॉल असोसिएशन च्या वतीने जागतिक टेनिस हॉलिबॉल दिनानिमित्त एसकेपी कॅम्पस बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉलीबॉल फेडरेशन, टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन, यांची वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी आयोजित केली होती. जागतिक टेनिस हॉलीबॉल दिनानिमित्त शिक्षकांची टेनिस हॉलीबॉल देखील आयोजित केली गेली होती. यावेळी टेनिस हॉलीबॉल खेळाचा इतिहास व नियमावली हस्तपुस्तिका आणि डॉक्टर वेंकटेश वांगवाड यांचे आनंदवाडी ते ऑलिंपिक हॉलीबॉल पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर सागर बालवडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, टेनिस व्हॉलिबॉल या खेळांचा इतिहास आणि नियमाची माहिती ती या पुस्तकांमुळे सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे या खेळाचा प्रचार आणि प्रसार होऊन निश्चितच वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. असोसिएशनच्या वतीने खेळाची वाढ व्हावी, नवनवीन खेळाडू तयार व्हावेत यादृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी डॉ. सागर बालवडकर (PRESIDENT PDTVA), डॉ. वेंकटेश वांगवाड(FOUNDER&CEO, आनंद खरे(PRSIDENT TVFI), रितेश वांगवाड(GENRAL SECRETARY), सुरेशरेड्डी क्यातामवर(PRESIDENT TVMA), गणेश माळवे(GENRAL SECRETARY), गणपत बालवडकर (CHIFPATTERN PDTVA), फिरोज शेख(SECRETARY PDTVA), निवृत्ती काळभोर(TREASURER PDTVA) आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  वृक्ष गजानन पर्यावरण पूरक संकल्पना डॉ. सागर बालवडकर यांच्या माध्यमातून सुरू.