सुस रोड परिसरातील दुकानांना अचानक आग गॅरेज चालकाचे मोठे नुकसान..! 

0
slider_4552

पाषाण :

पाषाण सुस रोड परिसरातील साई चौकाजवळ असलेल्या जय महाराष्ट्र गॅरेजला शुक्रवारी रात्री ९:३० मी. असपास अचानक आग लागल्याची घटना घडली. पाषाण अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

सुस रोड परिसरात साई चौकाजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक आग लागलेली येथील नागरिकांना पाहायला मिळाले. या ठिकाणी पाहिले जय महाराष्ट्र गॅरेज व आजूबाजूला असलेले दोन तीन पत्र्याची शेड ची दुकाने यांनी पेट घेतला. यामध्ये गॅरेज पूर्णतः जळून खाक झाली तर शेजारी असलेल्या फॅब्रिकेशन दुकानातील काही साहित्य जळाली होती.

गॅरेजमध्ये असलेली दोन दुचाकी वाहने या आगीमध्ये जळून खाक झाली. तर असलेले साहित्य मशीन जळाले असल्याने गॅरेज चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारी असलेले फॅब्रिकेशन मधले थोडेफार साहित्य जळाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत आग आटोक्यात आणल्यामुळे आजूबाजूला असलेले दुकानांचे मोठे नुसकान वाचले व मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण कळू शकले नसल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.

See also  वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीनं वंचित कुटुंबातील मुलींना ड्रेस मटेरियल स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांच्या पुढाकाराने वाटप...!