उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यांचल स्कूल बाणेर येथे रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

0

बाणेर :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ बाणेर आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पुणे, विद्यांचल हायस्कूल बाणेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले. रक्तदानाची सुरुवात आयोजक व युवा उद्योजक भालचंद्र मुरकुटे यांनी स्वतः रक्तदान करून केली.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अशोक मुरकुटे संस्थापक, अध्यक्ष, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, राज्यातील रक्त पेढी मधील रक्ताचा तुटवडा बघता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, राज्यातील रक्त साठा मध्ये वाढ होणे गरजेचे असल्याने आपल्याला समाजाचे काही देणे लागते. या धर्तीवर रुग्णांसाठी ‘रक्ताचं नातं’ जोडण्याचा आपुलकीचा प्रयत्न केला आहे.

या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, बाणेर नागरी पथसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, विशाल विधाते, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, नितीन कळमकर, पुनम विधाते, प्राजक्ता ताम्हाणे, ओमाराम चौधरी, मनोज बालवडकर आदी मान्यवर भेट दिली. तसेच योगिता मुरकुटे, स्वेता मुरकुटे, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचा स्टाफ आणि आचार्य आनंदरूषीजी ब्लड बँक डॉ. सविता गोखले आणि त्यांचा स्टाफ यांनी रक्तदान शिबिर पार पाडण्याकरता विशेष सहकार्य केले.

यावेळी रक्तदात्यांनी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचा सन्मान म्हणून प्रत्येक रक्तदात्यांना टिफिन बॉक्स देण्यात आला. यावेळी १०५ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरा करता माजी नगरसेविका रंजना मुरकुटे आणि उद्योजक भालचंद्र मुरकुटे यांच्या वतीने एक लकी ड्रॉ आयोजित केला गेला होता. त्यामधील तीन लकी विजेत्यांना पर्यावरणास पूरक अशा सायकली भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या हस्ते यावेळी हरिश आनंद, आशिष वर्‍हेकर, स्वप्नील भुमकर या तिन भाग्यवान रक्त्तदात्यांना सायकल भेट देण्यात आली.

See also  सचिन दळवी यांच्या वतीने लहान मुलांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन