शिवसेना व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेले रक्तदान शिबीर उत्साहात पार.

0

बाणेर :

शिवसेना व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल बाणेर धनकुडे नगर पॅन कार्ड रोड येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ६० जणांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक शिवलाल नाना धनकुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष शिवलाल नाना धनकुडे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोक मुरकुटे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शिवाजी बांगर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, विभाग प्रमुख संतोष तोंडे, हनुमंत मुरकुटे , आशुतोष आमले, श्याम बालवडकर, महेश सुतार, प्रा. संभाजी पाटील, आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल चे विराज धनकुडे, राहुल धनकुडे, लहू बालवडकर, काँग्रेसचे जीवन चाकणकर, पांडुरंग बालवडकर, निलेश निम्हण, पाषाण विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक राजाभाऊ सुतार ,गणेश कदम,अमित रणपिसे, संतोष चव्हाण, ऋतिक धनकुडे, ज्योती चांदेरे, सीमा शिंदे, सुहास धनकुडे, मंदार रारावीकर, सुषमा भोसले आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक कर्मचारी तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक, पुना ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचारी ,विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

शहर प्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, कोरोना कालावधी मध्ये रक्तदानाची गरज अधिक जाणवत असताना एक समाज शील उपक्रम लोकमत व शिवसेनेच्या माध्यमातून तसेच आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. रक्तदान हे खऱ्या अर्थाने अनेकांसाठी जीवनदान करणार आहे.

उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी सांगितले, एका व्यक्तीच्या रक्तदानातून अनेकांना जीवदान व अनेक कुटुंबांना या रक्तदानाच्या माध्यमातून नकळतपणे मदत होणार आहे. पुणे शहरात रक्ताचा तुटवडा असताना लोकमत व शिवसेनेने केलेला हा प्रयत्न प्रेरणा देणारा असून प्रत्येक रक्तदात्यासाठी देखील अभिमानास्पद क्षण असणार आहे.

See also  बाणेर विजय सेल्स मधील कंत्राटी कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा : मनसेची मागणी

यावेळी योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनीदेखील रक्तदान शिबिरास शुभेच्छा व्यक्त केल्या.