महेश सुतार यांचा समर्थकांनसह शिवसेनेत प्रवेश!

0

बाणेर :

राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज सुतारवाडी भागातील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश भिमराव सुतार यांनी समर्थकांसह महाराष्ट्र शासनाच्या क्रातीवीर लहुजीवस्ताद साळवे समीतीचे सदस्य बाळासाहेब भांडे यांच्या उपस्थितीत शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या हस्ते बाणेर येथे शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना उद्योग-सहकारसेनेचे जिल्हाप्रमुख आशुतोष आमले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.बाळासाहेब भांडे यांनी मार्गदर्शन केले व विभाग प्रमुख संतोष तोंडे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

यावेळी सुनील कळमकर (विभाग समन्वयक), दिनेश नाथ (विभाग संघटक), कमलेश सुतार (उपविभाप्रमुख), ऋषीकेश कुलकर्णी (प्रभागप्रमुख), सुनील राजगुरू (शाखाप्रमुख), अजय निम्हण(युवासेना), अजिंक्य सुतार(शाखाप्रमुख) ,गणेश दळवी (शाखाप्रमुख), संकेत तुपे(उपशाखाप्रमुख), कुणाल गोळे, अक्षय पिलाणे, तुषार हुलावळे, ओंकार हुस्माने आदी उपस्थित होते.

See also  प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी अग्रस्थानी असते महिला : चित्रा वाघ