प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी अग्रस्थानी असते महिला : चित्रा वाघ

0

बाणेर :
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि पुणे शहरअध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बाणेर बालेवाडी येथील महिला सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, महामारी कशी असते हे सर्वांनी कोरोना संक्रमण काळात अनुभवले आहे. या वाईट परिस्थितीत महिलांनी फार मोठे योगदान दिले आहे. नर्स, डॉक्टर, पोलीस, एनजीओ अशा विविध माध्यमातून महिलांनी खंबीरपणे लढा दिला आहे. अगदी घरात सुद्धा येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी महिला अग्रस्थानी आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी महिलांनी भाजप सदस्य नोंदणी मध्ये भाग घेऊन गरजू महिलांकरता मदत करण्यासाठी बाहेर यावे असे आव्हान त्यांनी केले. तसेच अमोल बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या साठी हे उपक्रम राबविले आहेत त्याचे कौतुक त्यांनी केले असेच सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करावे असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कोरोना संक्रमण काळात रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना मदत करत होता. अशा वेळी राज्य सरकार मात्र सर्वसामान्यांना दुर्लक्ष करीत जबाबदारी झटकत होते असे त्यांनी नमूद केले. अमोल बालवडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असाच पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काहीसे कमी झाले असले तरी करणाचे संकट अजून पूर्णपणे कमी झालेले नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा रक्ताची नाती कमी पडतात तेव्हा या कठीण काळामध्ये महिलांनी डॉक्टर, नर्स, पोलीस, एनजीओ अशा विविध भूमिकेतून फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता त्यांचा गौरव होणे गरजेचे होते. म्हणून त्यांचा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्याचे ठरविले तसेच महिलांनी भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा ह्याकरता विशेष अभियान राबविले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

See also  डॉ. सागर बालवडकर यांच्यावतीने 'एस के पी रोलिंग ट्रॉफी' टी-१० इंटर सोसायटी क्रिकेट प्रिमिअर लीगचे आयोजन

यावेळी डॉ. संपदा तांबोळकर, डॉ. आसावरी मांजरेकर, डॉ. रुपाली गुलवानी, डॉ. स्मिता इंगळे, डॉ. शीतल चोपडे, डॉ. अर्चना डंगरे, डॉ. तृप्ती पारे, डॉ. सुषमा जाधव, डॉ. अनिता बापट खांदवे, डॉ. प्रीती नेवे, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. दीपाली चव्हाण, डॉ. निकिता लोणकर, डॉ. प्रमिला क्षीरसागर, डॉ. योगिता कचरे, डॉ. सोनाली शेळके, डॉ. अंकिता चव्हाण, डॉ. अमृता रॉड्रिग्ज, डॉ. जयश्री कर्पे, डॉ. माधवी राराविकर, डॉ. कोमल कापसे, डॉ. स्नेहल दुश्मन, डॉ. श्रद्धा आव्हाळ, डॉ. सुश्मिता मोटे, डॉ. निकिता भोसे आदी महिला डॉक्टर्स तसेच नमिता शेट्टी, कोमल मुजमाल, सुप्रिया घोरपडे, श्रद्धा मुदलीक, जेन्सी जॉन आदी महिला परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सुप्रिया पांढरकर, वनिता जाधव, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, श्वेता शिंदे आदी महिला पोलीस आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता बाहेती, अंबिका नायर, वल्लरी कांबळे, उल्का शाह, अंजली केळकर या महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी राहुल कोकाटे, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, अध्यक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघ उमा गाडगीळ, महिला अध्यक्ष स्वरूपा शिर्के, सरचिटणीस अस्मिता करंदीकर, अनिल ससार, रोनक गोटे, शशिकांत बालवडकर, मनोज कुमकर, कोथरुड वि. युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा बालवडकर, प्रभाग उपाध्यक्ष विशाल बालवडकर, अतुल आमले, मंदार राराविकर, रोहित पाटील, सुभाश भोळ, गणेश पाडाळे, दादा गायकवाड, योगेश बालवडकर, प्रविण बालवडकर, विशाल बालवडकर, सुधीर बालवडकर, आकाश बालवडकर, शुभम बालवडकर, विराज बालवडकर, रोहित बालवडकर, निलेश बालवडकर, अमोल पाडाळे, जालिंदर भंडारी, वैभव बालवडकर, वैभव टकले, सुमित कांबळे, प्रसाद बालवडकर तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सभासद व सर्व कोविड योद्धा महिला व नवीन भाजपा महिला सभासद उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आघाडी सरचिटणीस अस्मिता करंदिकर यांनी केले.