अविनाश भोसले या प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाची मालमत्ता इडी कडून सील !

0

मुंबई :

मूळचे कराड तालुक्यातील तांबवे गावचे रहिवासी असलेले व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले अविनाश भोसले या प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मालमत्ता सील करण्यात आलेली आहेत. अविनाश भोसले यांच्या पुणे व नागपूर येथील मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची 40.34 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.

कराड शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबवे या गावचे अविनाश भोसले हे रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी रिक्षा चालक म्हणून त्यांनी पुण्यात आपले सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे संबंध राजकीय नेत्यांशी आले व बांधकाम व्यवसायात त्यांनी पदार्पण केले होते. महाराष्ट्रातील प्रख्यात बांधकाम व्यवसाय म्हणून त्यांची ओळख आहे.
https://twitter.com/dir_ed/status/1406962636047060998?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406962636047060998%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

अविनाश भोसले यांची 40.34 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याने त्यांच्यावरील या कारवाईने महाराष्ट्रातील राजकीय तसेच बांधकाम व्यवसायात खळबळ उडवून दिली आहे. पुणे व कराड तालुक्यात या कारवाईमुळे अविनाश भोसले यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

See also  महाविकास आघाडीत धुसफूस.?