कोरोना वाढत असून नागरिकांनी जास्तीत जास्त काटेकोरपणे नियमांचे पालन करावे : बाबुराव चांदेरे

0

बाणेर :

पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिनित्त कोविड काळात बाणेर येथील डेडीकेटेड कोव्हीड हॅास्पिटल मधील विशेष कामगिरी केलेल्या सर्व डॅाक्टर्स,परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांसह ३५० कोविड योध्दांचा सत्कार समारंभ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

सध्या कोरोना वाढत असून पुन्हा काळजी घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त काटेकोरपणे नियमांचे पालन करावे. सुरुवातीच्या काळात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्यांचा सन्मान करणे महत्त्वाचे असून, त्यांच्यावरही सध्या जबाबदारी वाढली आहे. हा करण्यात आलेला सन्मान त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देत राहील, असे मत या प्रसंगी बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.९ तर्फे डेडीकेटेड कोव्हीड हॅस्पिटला वॅाटर डिस्पे्सर सप्रेम भेट देण्यात आला. यावेळी नितीन कळमकर, डॉ. सागर बालवडकर, माणिक गांधीले, समिर चांदेरे, मनोज बालवडकर, राखी श्रीराव, चेतन बालवडकर, सुशिल मुरकुटे, डॅा.किरण भिसे, देवदन वळवी, डॅा.राजेश नवरत्ने, अदि मान्यवर उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रिक्षाचालकांचा विमा...!