बाणेर येथील शिवसेनेच्या वतीने कष्टकरी महिलांचा सन्मान.

0

बाणेर :

कोरोनाच्या संकटांतून सावरणाऱ्या कित्येक कुटुंबामध्ये महिलांच्या निर्णय़ांचीही महत्त्वाची भूमिका असून, यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार लागत असल्याची बाब यंदाच्या महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यांन समोर मांडली जावी या उद्देशाने महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने बाणेर बालेवाडी परिसरातील कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. कोरोना कालावधीमध्ये नागरिकांची सेवा करणाऱ्या कष्टकरी महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी रोहिणी राजेंद्र धनकुडे यांच्या हस्ते महिलांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी रोहिणी धनकुडे म्हणाल्या, कोरोना कालावधीमध्ये या कष्टकरी महिलांनी अनेक घरांमध्ये सेवा बजावली आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांची देखील सेवा केली आहे. घर व आपले काम सांभाळताना या महिलांनी खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाची भूमिका बजावली आहे म्हणून या महिलांचा देखील सत्कार होणे ही प्रेरणादायी बाब आहे.

यावेळी बाणेर बालेवाडी परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

See also  शिवसेनेच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरात घरोघरी जाऊन हळदी कुंकू समारंभ साजरा