सुसगाव, पाषाण परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…

0

सुसगाव :

अखिल सुसगाव शिवजयंती उत्सव व ग्रामस्त यांनी सरकारचे नियम पाळून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून महिलांची वारकरी दिंडी लावून टाळ मृदंग च्या तालावर मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. तसेच उत्सव कमिटी तर्फे करोना च्या कठीण काळात लोकांना मदत करणाऱ्या ग्रामपंचायत सुस कर्मचारी तसेच सरकारी डॉक्टर व सार्वजनिक मंडळांचा स्मृति चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दिंडी मधे महिलांचा सहभाग उल्खनीय होता. अखिल सुसगाव शिवजयंती उत्सव दर वर्षी छान प्रकारे उपक्रम राबवतात.

गुरुदेव चॅरिटेबल ट्रस्ट सुसगाव च्या वतीने शिवजयंती निमित्त शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच सुस हॉस्पिटल व ओम ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

 

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरात आज शिवजंयती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संतसेवक ह.भ.प.मारुतीमहाराज कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प. खंडूशेठ अरगडे, रामदास कोकाटे, भाजपा नेते राहुल कोकाटे, उत्तम जाधव, नवनाथ ववले, नारायण जाधव, गणेश भिसे, शिवाजीभाऊ कोकाटे, नंदकुमार कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, आकाश पवार, मंगेश आंबरुळे आदि मान्यवर उपस्थित होते. मारुती महाराजांनी यावेळी भक्ती-शक्ती या विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच संत तुकाराम शाळा पाषाण येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, तसेच मुख्यधापिका यादव मॅडम, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाषाण गावातील सर्व्हे.न.१ पंचशीलनगर येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तमभाऊ जाधव, प्रमोद कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

See also  मॅकन्यूज. लाईव्ह चा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार... मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा..‌‌..‌!