पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांची बदली राज्याचे नोंदणी महानिरीक्षक (आयजीआर) पदावर झाली आहे. गेले पावणे चार वर्षे महापालिका आयुक्त म्हणून हर्डीकर यांनी शहराला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केले. दरम्यान, राजेश पाटील यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती कऱण्यात आली आहे.
ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणारे राजेश पाटील २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तपदी नियुक्त करण्यात येईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, राजेश पाटील यांचे नाव नंतर आघाडीवर आले.
राज्यात भाजपाची सत्ता जाऊन महाआघाडीची सत्ता आली त्यावेळेपासून हर्डीकर यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची कार्यपध्दती पाहून त्यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय केला. कोरोना काळात देशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती गेले आठ महिने सुट्टी न घेता अहोरात्र कष्ठकेले.
राजेश पाटील यांचा थोडक्यात आढावा…
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.