पुणे :
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थ उत्पादन प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात सात ऑक्टोबर २०२० ला २० किलो मेफेड्रोन (एमडी) पकडले होते. या गुन्ह्यात ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ललित पाटीलसह वीस जणांवर गुन्हे दाखल असून, त्यांच्याविरोधात ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
यापैकी आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, तर उर्वरित बारा आरोपी अद्याप येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाने तक्रारदार पोलिस अधिकारी शकीर गोसोद्दीन जेनेडी यांची साक्ष नोंदवली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका कारमधून २० किलो मेफेड्रोन पकडले होते. त्यातून अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले. तपासादरम्यान आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा पंधरा किलो एमडी तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकरणात पोलिसांनी ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक केली होती. यांच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले होते
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून त्यापैकी न्यायालयात सादर केलेल्या नमुन्यांचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण केले नसल्याने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) तरतुदींची पूर्तता झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ आरोपींना गेल्या महिन्यात जामीन मंजूर केला होता.
मेफेड्रोन पकडल्याची कारवा ‘इ कशी झाली, त्यावेळी कोणत्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते, यासह कारवा ‘इचा घटनाक्रम जेनेडी यांनी साक्षीत सांगितल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांनी दिली. पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.