आपल्या क्षेञात पायोनियर व्हा : प्रा.शामकांत देशमुख

0

पुणे :

गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न कला , विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय कम्पुटर सायन्सतर्फे डिपार्टमेंट तर्फे “कप्यूटर सायन्स र्ईंटरएक्शन 2021″ हा कार्यक्रम गेली 18 वर्षे पदवी व पदविका विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येतो.

याही वर्षी 2, 3 व 4 फेब्रुवारी दरम्यान. हा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रा.शामकांत देशमुख यांनी केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले,” कंप्यूटर सायन्सच्या विद्यार्थ्यानी वेगवेगळे अँप व साॅफ्टवेअर डेव्हलप केले पाहिजेत. COVID -19 मधे आलेल्या संधीचे सोने करा. बदलांचा स्विकार करुन नविन कल्पना राबवून नविन व्यवसाय सुरु करा. बदलांचा स्वीकार करुन नविन क्षेञे काबीज करा. Fast track, online gas booking अशी अत्यंत सोपी उदाहरणे त्यांनी दिली.”

प्राचार्य डॅा संजय खरात यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले महाविद्यालयात आम्ही विद्यार्थांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला शिकवतो. छोटे संशोधन प्रकल्प हे शास्त्र शिकण्यास मदत करतात.
डॅा भातांब्रेकर, कंप्यूटर सायन्स विभाग प्रमुख यांनी त्यांच्य विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

तीन दिवसीय कार्यक्रमात ऑनलाइन कंप्यूटर quiz , ऑनलाइन पोस्टर प्रेसेंटेशन, ऑनलाइन प्रोजेक्ट, grab and opportunity अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी विविध देश , १२ राज्ये व ४८ शहरातील ८९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. विजेत्यांना अनुक्रमे रु १०००, ७०० ,५०० असे बक्षीस दिले जाईल.

प्रा.वर्षा जोशी, उपप्राचार्य शास्त्र विभाग यांनी मार्गदर्शन केले. सर्व कार्यक्रमाचे समन्वय प्रा.अमोल पाटील यांनी केले. सुञसंचलन प्रा. ऋतुजा मोकाशी यांनी केले तर खास college website चे प्रेझेंटेशन प्रा. मंगेश लहाने यांनी केले. सर्व उपक्रमांचे डाॅ. प्रकाश दिक्षित, उपसहकार्यवाह व प्रा.सुरेश तोडकर, सहकार्यवाह पी ई सोसायटी यांनी कौतुक केले.

See also  पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर