पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग थेट अटल सेतूला जोडणार; दोन शहरांचे अंतर होणार कमी

0

पुणे :

अवघ्या दोन तासांमध्ये मुंबईवरून पुणे गाठता येणार आहे. मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या साडेतीन तासांचा वेळे लागतो. अटल सेतूवरून जेएनपीटी मार्गे पुण्याला पोहोचता येणार आहे. या नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरूला जाणं अतिशय सोपं होणार आहे.

नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा कालावधी आणखी कमी होणार आहे. 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग असणार आहे. हा महामार्ग थेट चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असणार आहे.या महामार्गावर वेगवान प्रवासासाठी 8 लेन असणार आहेत.

या रस्त्याच्या बांधणीसाठी अंदाजे 17 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च होईल. सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या नव्या महामार्गाची रुपरेषा तयार केली जात आहे.अटल सेतू आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. अटल सेतूवरून खाली उतरल्यानंतर 14 पदरी रस्ता तयार केला जाणार आहे.

हा महामार्ग थेट बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणार आहे. यासोबत हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे सातारा आणि सोलापूरला जाणं देखील सोपं होणार आहे.

See also  गावातील कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी, दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन !